तर मला अटक करा ! : धुळ्याचे माजी आमदार गोटेंनी दिले आव्हान


Then arrest me!: Former Dhule MLA Gote challenges धुळे (22 मे 2025) : विधी मंडळ अंदाज समितीला देण्यासाठी पाच कोटींची रक्कम धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत ठेवल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी सायंकाळी केला होता. यानंतर प्रशासनाच्या उपस्थितीत खोलीचे कुलूप तोडण्यात आल्यानंतर या खोलीतून तब्बल एक कोटी 84 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. आमदार अर्जुन खोतकर यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हा प्लॅन असल्याचे म्हणत सर्व आरोप फेटाळल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी सरकार तुमचे असल्याचे सांगत आपण खोटं बोलत असल्यास अटक करण्याचे आव्हान दिले आहे.

तर यांच्यावर काय विश्वास ठेवायचा
माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की, अर्जुन खोतकर हे आपल्याला कधीपासून ओळखतात? दर सहा महिन्यांनी पक्ष बदलून बेडूक उड्या मारणार्‍या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा?

शासकीय विश्रामगृहात सापडलेले एक कोटी 84 लाख 84 हजार नेमके कोणाचे आहेत? तुमचा पीए 15 मे 2025 पासून त्या ठिकाणी का आलेला होता? अनिल गोटे खोटे आरोप करत असतील तर सरकार तुमचे आहे, मला अटक करा, असे आव्हान त्यांनी अर्जुन खोतकर यांना दिले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !