धुळे रेस्ट हाऊसमधील एक कोटी 84 लाख जप्त प्रकरण : पोलिसांसह आयकर विभागाकडून स्वतंत्र चौकशी

Dhule Rest House Rs 1.84 crore seized case: Separate investigation by Income Tax Department along with policeधुळे (22 मे 2025) : धुळ्यातील ‘गुलमोहर’ या शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार हजार 200 रुपयांचे घबाड ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर चौकशीत सापडले होते. पोलिसांनी शासकीय सोपस्कार पूर्ण करीत ही रक्कम ट्रेझरीत सुरक्षित ठेवली आहे. नाशिक आयकर विभागाचे अतिरीक्त संचालक यांना या प्रकरणी सूचित करीत बीएनएसएस कायद्याच्या कलम 173 (3) अन्वये चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पोलिसांकडून प्राथमिक चौकशी
गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत जिल्हा दौर्यावर आलेल्या आमदारांच्या समितीला देण्यासाठी पाच ते साडेपाच कोटी जमवल्याचा आरोप माजी आमदार गोटे यांनी करीत बुधवारी सायंकाळी ‘त्या’ खोलीबाहेर चार तास ठिय्या मांडला होता. प्रशासनातील अधिकार्यांनी रात्री उशिरा धाव घेत ‘त्या’ खोलीचे कुलूप तोडल्यानंतर तब्बल एक कोटी 84 लाखांचे घबाड हाती लागले होते. पोलिसांनी जप्त केलेली रोकड गुरुवारी ट्रेझरीत जमा केली असून बीएनएसएस कायदा कलम 173 (3) अन्वये आता चौकशी सुरू केली आहे शिवाय नाशिक विभागाचे अतिरिक्त आयकर संचालक यांना या प्रकरणी सूचित केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आयकर विभागाकडून स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

काय घडले धुळ्यात
धुळ्यात बुधवारी अंदाज समितीच्या दौर्यासाठी 11 आमदार दाखल झाले आहेत. या आमदारांना देण्यासाठी पाच ते साडेपाच कोटी रुपये शासकीय विश्रामगृहाच्या 102 नंबरच्या खोलीत ठेवण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी सायंकाळी केला होता. जिल्हाधिकार्यांच्या किंवा पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत ती खोली उघडण्याची मागणी गोटे यांनी केली होती मात्र रात्री 11 वाजेनंतर वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर ही खोली उघडताच आतमध्ये नोटांच्या थप्प्या सापडल्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
उर्वरित रक्कम कुठे गेली?
गोटे यांच्या दाव्यानुसार पाच कोटी रुपये सापडले नसले तरी सुमारे 1.84 कोटी रुपये सापडले आहेत. यामुळे उर्वरित रक्कम कुठे गेली असा सवालही उपस्थित होत आहे. खोलीला टाळे ठोकण्यापूर्वीच कोणाला ही रक्कम पोहोच केली गेली का, असाही सवाल गोटे यांनी उपस्थित केला जात आहे.
आमदार खोतकरांनी फेटाळले आरोप
महाराष्ट्र विधी मंडळातील अंदाज समिती नेतृत्व करणारे आमदार अर्जुन खोतकर यांनी आमदारांना हे पैसे देण्यासाठी आणले होते हे आरोप फेटाळले आहेत. आपला पीए त्या खोलीत राहत नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांनी हा प्लॅन केल्याचा आरोपही खोतकर यांनी केला आहे.
