कौटूंबिक वादातून पतीचा पत्नीवर हातोड्याने हल्ला : भुसावळ तालुक्यातील घटना


Husband attacks wife with hammer over family dispute : Incident in Bhusawal taluka भुसावळ (22 मे 2025) : घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील किन्ही एमआयडीसीमधील सेंट पाँल शाळेजवळ सुरू असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दि.20 मे रोजी रात्री 1 ते 3 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात संतोष लालीया खर्ते (रा. रूकगड, ता. भगवानपूरा, जि. खरगोन, मध्य प्रदेश, ह.मु. किन्ही एमआयडीसी, भुसावळ) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके
राजेश नहारसिंग बारेला (वय 28, रा. हिंगोणा, ता. यावल, जि. जळगाव, मूळ रा. सातताळी, ता. झिरण्या, जि. खरगोन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची बहीण आशाबाई संतोष खर्ते ही सेंट पाँल शाळेजवळील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेली असताना तिचा पती संतोष खर्ते याने घरगुती कारणावरून रात्री तिच्याशी भांडण केले. भांडणाच्या दरम्यान ’मी तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत संतोषने रागाच्या भरात घरात असलेला लोखंडी हातोडा तिच्या डोक्यात मारला. यामुळे आशाबाईच्या डाव्या कानाजवळ गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर संशयीत संतोष हा रात्रीच घटनास्थळावरून पसार झाला. जखमी महिलेस उपचारार्थ हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल काला आहे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नंदकिशोर काळे पुढील तपास करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !