काँग्रेस-राष्ट्रवादीने करावी मेगा गळतीची चिंता -मुख्यमंत्री


नंदुरबारसह दोंडाईचा येथील सभेत विरोधकांवर साधला निशाणा

नंदुरबार : गेल्या 70 वर्षात काँगे्रसने जनतेची दिशाभूल करत भूलवत ठेवले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशात विकासाचे पर्व सुरू झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला आता मेगा गळती लागली असून ती कशी थांबेल याची चिंता विरोधकांनी करण्याची गरज असल्याचा टोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार व दोंडाईचा येथील सभेत हाणला. गेल्या पाच वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी जनतेपुढे मांडत गेल्या 20 वर्षात जे झाले नाही ते काम आपण तीन पटीने राज्यात केल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी अनेक दिग्गजांनी भाजपात प्रवेश केला.

धुळ्यात ‘रोड शो’
शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो अर्थात महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. रथावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.सुभाष भामरे,भाजप जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल स्वार होते. खंडेराव मंदिर, प्रभाकर चित्रमंदिर, पाचकंदिल, शहर पोलिस चौकी, सराफ बाजार, कराचीवाला खुंट, फुलवाला चौक, गांधी पुतळाकडून महाजनादेश यात्रा मोठ्या पुलावरून देवपूरात गेली. पंचवटी, नेहरू चौक, दत्तमंदिरपासून पुढे नगांवबारीकडून ही महाजनादेश यात्रा दोंडाईचाकडे रवाना झाली.


कॉपी करू नका.