भुसावळातील व्यापार्याच्या गोदामातून 35 लाखांच्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची चोरी : शिरपूरातील दोघांना अटक

भुसावळ (19 जून 2025) : शहरातील गायत्री नगर परिसरातील डिस्को म्युझिक सेंटरच्या गोदामात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सुमारे 35 लाख रुपये किंमतीचे टीव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन लांबवल्यचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. बाजारपेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवून शिरपूरातील दोघांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून 18 लाख 80 हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. मुजावर जमील शेख चांद (48, न्यु बोराडी, ता.शिरपुर, ह.मु.गणेश कॉलनी, आर.सी.पटेल उर्दु शाळेजवळ, शिरपूर) व जफर शेख मुजावर (24, रा.मुजावर मोहल्ला, शिरपुर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बंद गोदामाला टार्गेट
भुसावळ शहरातील गायत्री नगरात नंदलाल मिलकीराम मकडीया (62, रा.श्रीहरी नगर, भुसावळ) यांचे फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्हीचे गोडावून आहे. रविवार, 15 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ते सोमवारी 16 जून रोजी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी बंद गोदामातून अज्ञात चोरट्यांनी फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्ही असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल लांबवला होता. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर नंदलाल मकडीया यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांनी चोरीचा मुद्देमाल ठेवला शिरपूरात
गुन्ह्याच्या तपासादरम्यान बाजारपेठ पोलिसांना चोरी केलेला मुद्देमाल हा शिरपूरात लपवून ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिरपुर शहरातील करवंद रोड, महावीर लॉन्स येथील एका खाजगी पत्र्याचे गोदाम गाठत लपवलेल्या मालाची खातरजमा केल्यानंतर हे साहित्य चोरीचे असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी पंचनामा करीत 18 लाख 80 हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त करीत गोदाम मालक मुजावर जमील शेख चांद (48, न्यु बोराडी, ता.शिरपुर, ह.मु.गणेश कॉलनी, आर.सी.पटेल उर्दु शाळेजवळ, शिरपूर) व जफर शेख मुजावर (24, रा.मुजावर मोहल्ला, शिरपुर) यांना अटक केली.
मूळ चोरट्यांचा कसून शोध
चोरी केलेला माठ साठवणूक प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असलीतरी भुसावळात चोरी करणारी परप्रांतीय टोळी असल्याचा यंत्रणेला संशय आहे. पोलिस पथक चोरट्यांच्या मागावर असून लवकरच त्यांनाही अटक करण्यता येईल, असे विश्वास तपासाधिकारी राहुल वाघ यांनी व्यक्त केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील हवालदार उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हवालदार विजय नेरकर, हवालदार संदीप धनगर, पोलीस शिपाई सचिन चौधरी, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई अमर अढाळे, शिपाई प्रशांत सोनार, शिपाई भूषण चौधरी, शिपाई राहुल वानखेडे, शिपाई जावेद शहा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सहा.फौजदार रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, हवालदार मुरलीधर धनगर, हवालदार संदीप चव्हाण, हवालदार प्रवीण भालेराव, चालक भरत पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार महेश चौधरी, शिपाई राहुल भोई आदींच्या पथकाने केली.
