शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : 43 किलो गांजासह वाहन जप्त

संशयीत पसार : गोपनीय माहितीवरून कारवाई


Major action by Shirpur Taluka Police : Vehicle seized with 43 kg of ganja शिरपूर (20 जून 2025) : शिरपूर तालुका पोलिसांनी गस्तीदरम्यान कारवाई करीत एका वाहनातून 43 किलो गांजा जप्त केला आहे. कनगई गावाजवळ गस्तीवर असताना 18 रोजी ही कारवाई करण्यात आली. संशयीत पसार झाला असलातरी वाहनातून 43 किलो गांजा जप्त करण्यात आला व तसेच वाहनही जप्त करण्यात आले.

गस्तीवर असताना कारवाई
शिरपूर तालुाक पोलिस गस्तीवर असताना कार (क्र.एम.एच. 47 यांनी बी.एक्स 0225) बाबत संशय आल्यानंतर त्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा करताच चालकाने पोलिसांना पाहून वेगाने पळवल्याने पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर आरोपीने शिरपूर शहरातील एका लोकवस्तीत वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ वाहन शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात आणून पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात चार लाख 31 हजार 900 रुपये किंमतीचा 43 किलो गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तर तीन लाखांची कारही जप्त करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल सुनील पवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, हवालदार संतोष पाटील, संजय चव्हाण, संदीप ठाकरे, शेखर बागुल, सुनील साळुंखे, योगेश मोरे, सुनील पवार, सागर कासार, कृष्णा पावरा, भूषण पाटील, वाला पुरोहित, धनराज गोपाळ, प्रकाश भील आणि दिनकर पवार आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !