अमेरिकेला हल्ल्याचे आता अभूतपूर्व उत्तर मिळणार ! : अयातुल्ला खामेनींचा इशारा

America will now get an unprecedented response to the attack!: Ayatollah Khamenei warns वृत्तसंस्था । नवी दिल्ली (22 जून 2025) : अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमधील तीन महत्त्वाच्या अणुकेंद्रांवर जोरदार हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाल्यानंतर आता इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला जशास तसे उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले खामेनी
आता उत्तर देण्याची आमची वेळ आहे, अशा इशारा इराणच्या वृत्तपत्रातून देण्यात आला आहे. आधी बहारीनमधल्या अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला करा. बहारीनवर हल्ला केल्यास अमेरिकेची जहाजे फिरकणार नाहीत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मन यांच्या जहाजांना जागा मिळणार नाही, असे या वृत्तपत्रात म्हणण्यात आले आहे.
‘युद्ध तुम्ही सुरू केले त्याचा शेवट आम्ही करू. अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल. अमेरिकेचं कधी झालं नाही, असं नुकसान होईल, असा थेट इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेला दिला आहे त्यामुळे इराणनेही आता जशास तसा उत्तर देण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसून येते.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इस्रायलकडून संभाव्य हत्येचा धोका लक्षात घेता, खामेनी यांनी आपल्या तीन उत्तराधिकार्यांची निवड केली असल्याची माहिती समोर आली आहे. अलीरेजा अराफी, अली असगर हेजाजी आणि हासिम हुसैनी बुशहरी, अशी त्यांची नावे असल्याचे समजते. यामध्ये खामेनी यांचे पुत्र मुजतबा खामेनी यांचे नाव नाही, हे विशेष लक्षवेधी आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे खामेनी यांची तीन दशकांपासूनची सत्ता धोक्यात आल्याचे मानले जात आहे. तसेच, सध्या खामेनी एका अत्यंत सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची माहितीही समोर आली आहे.
