भुसावळातील पंचशील नगरातील दोन घरफोड्या : स्थानिक आरोपींना अटक

बाजापेठ पोलिसांची कामगिरी : दोन लाख 49 हजारांचा ऐवज जप्त


Two burglaries in Bhusawal’s Panchsheel Nagar: Local accused arrested भुसावळ (12 जून 2026) : शहरातील पंचशील नगरात झालेल्या दोन धाडसी घरफोड्यांची स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी उकल करीत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन 49 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. सैय्यद तोहीद सैय्यद मणियार (21) व अरबाज शेख अजमल शेख (26, दोघेही रा. पंचशील नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पंचशील नगरातील रहिवासी शुभम विनायक जामनकर (32) हे 18 मे ते 7 जून 2026 दरम्यान बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातून एक लाख 46 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते व बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ यांना या गुन्ह्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर वरील दोघा आरोपींना अटक करण्यात आली व त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून एकूण दोन लाख 49 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे, योगेश माळी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, जीवन कापडे, जावेद शाह, अमर अढाळे, दिलीप कोल्हे, अक्षय कोतकर, चंद्रकांत रायपूरकर आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !