धुळ्यात पोलिसांवर किरकोळ दगडफेक : संशयीतांची धरपकड
धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असतानाही काही नागरीक एकत्र आल्याने पोलिसांनी त्यांना हटकल्याने संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. शनिवारी दुपारी एक वाजेच्या ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे व पोलिस निरीक्षक दिनेश आहेर व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला तसेच या प्रकरणी शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीकामी पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले तर जमावाच्या दगडफेकीत सुदैवाने कुणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले.

