धुळ्यातील 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह


शहरात उडाली खळबळ : रुग्णाचा रहिवास परीसर सील करण्याची प्रक्रिया सुरू

धुळे : शहरातील 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच मालेगावच्या तरुणीसह साक्रीतील कोरोना पॉझिटीव्ह इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा धुळ्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने यंत्रणा प्रचंड सतर्क झाली आहे. प्रशासनासह आरोग्य विभागाने रुग्ण राहत असलेल्या परीसर सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !