धुळे : पुन्हा तीन पॉझिटीव्ह रुग्ण आळढले
धुळे : एका पुरूषासह दोन महिलांचे नव्याने कोरोना रीपोट र्पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 19 वर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. धुळे शहरात आता एकूण 14 बाधित झाले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. साक्री शहर, बाह्मणे (ता. शिंदखेडा), आमोदे (ता. शिरपूर) येथे प्रत्येकी एक रूग्ण होता. आता साक्री शहर व आमोदे येथे प्रत्येकी दुसरा कोरोनाग्रस्त रूग्ण आढळला असून यात दोन्ही महिला आहेत.

