भुसावळ होणार जिल्हा ! : मुख्यमंत्र्यांचे सूचक संकेत


भुसावळ : भुसावळ शहराला जिल्हा करणार का ? या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परीषदेत जिल्हा निर्मितीसाठी मेरीट समिती तयार करण्यात आली असून या समित्यांचे कामकाज वेगात सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एकाचवेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिल्हा निर्मिती करण्यात येईल, असे सूचक विधानही त्यांनी केले. त्यामुळे भविष्यात भुसावळ नक्की जिल्हा होईल, अशी आशा शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.

एमआयडीसीबाबत लक्ष घालणार
भुसावळातील एमआयडीसीबाबत ठोस निर्णय आपण घेतला नाही, या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार लवकरच भुसावळ-जळगावसासाठी लक्ष घालणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

पीक विम्याचा सर्वाधिक लाभ
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विम्याबाबत सरकारवर टिका केल्याची व विमा कंपन्यांचे अधिक चांगभले झाले याबाबत प्रश्‍न छेडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांनी पाच वर्षात दोन हजार 161 कोटी भरले मात्र त्यांना 14 हजार 940 रुपये कोटींचा परतावा मिळाल्याचे ते म्हणाले. जर एखादा शेतकरी वा सर्कल सुटले असलेतर तर निश्‍चित त्यांना लाभ देवू, असेही ते म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधाकृष्णमध्ये शुक्रवारी रात्री मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सकाळी 10.30 वाजता प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार हरीभाऊ जावळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी केले.


कॉपी करू नका.