कत्तलीसाठी गुरे आणणार्या धुळ्यातील दोघांविरुद्ध गुन्हा
धुळे- कत्तलीसाठी गुरे आणणार्या धुळ्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वडजाई रोडलगत असलेल्या इसाक मशिदीच्या मागील गफुरनगरात हा प्रकार घडला. याठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली असता तिथे 27 हजार रुपये किमतीचे दोन गावरान जातीच्या गायी, एक काठेवाडी व तीन वर्षे वयाचा जरसी गोर्हा अशा चार गुरांना बांधलेले होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस नाईक दत्तात्रय लिंगायत यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव पोलिस ठाण्यात मान्या कुरेशी व सद्माम कुरेशी या दोघांविरूध्द कत्तलीसाठी जनावरांना बांधून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.