मुक्ताईनगरच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी नंदराज पाटील

प्रमोद वाघ यांची नियुक्ती तीन दिवसात रद्द ः आता नाशिक शहर सहा.आयुक्तपदी बदली


Nandraj Patil appointed as the new Deputy Superintendent of Police for Muktainagar भुसावळ (26 जून 2026) : राज्यातील 224 पोलीस निरीक्षकांना शासनाने पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती देत त्यांची नियुक्ती केली होती. मुक्ताईनगर उपअधीक्षक प्रमोद वाघ यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांची प्रतीक्षा असतानाच तीन दिवसात शासनाने ही बदली रद्द केली असून त्यांच्या जागी मुंबई रेल्वेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज दिनकरराव पाटील यांची नियुक्ती केली आहे.

राज्य शासनाचे गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी शुक्रवार, 26 जून रोजी राज्यातील 27 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यात मुक्ताईनगरचाही समावेश आहे. मुक्ताईनगरला नियुक्त पोलीस उपअधीक्षक प्रमोद सदाशीव वाघ यांच्याकडे आता नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्ताची जवाबदारी देण्यात आली आहे.



दरवर्षाप्रमाणे यंदादेखील गृहविभागाच्या बदल्यांमध्ये सावळा-गोंधळाची परंपरा दिसून आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !