कोल्हाडी येथे धाडसी चोरी : 75 हजारांच्या रोकडसह 19 ग्रॅमचे दागिने लांबवले


Daring theft at Kolhadi : Cash worth ₹75,000 and 19 grams of jewelry stolen बोदवड (26 जून 2026) : बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी एका घरातून 75 हजारांची रोक्ड व 19 ग्रॅमचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना शुक्रवार, 25 जून रोजी सायंकाळी उघडकीस आली.

पाळत ठेवून चोरीचा संशय
सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हाडीतील राजेंद्र नारायण ढाके यांच्यासह पत्नी शेतात पेरण्यासाठी गेल्यानंतर त्यांची आई लक्ष्मीबाई घरात एकट्याच होत्या. चोरट्यांनी घरात शिरून पेटीतील 19 ग्रॅम सोन्याच्या वजनाचे दागिने तसेच 75 हजारांची रोकड चोरी केल. चोरीची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध बोदवड पोलिात गुन्हा दाखल करण्यात आला.



स्थानिक नागरिकांनी परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !