पावसाळ्यापूर्वी शासनाच्या कालबाह्य वाहनांचा तत्काळ लिलाव करा : माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


Auction off the government’s obsolete vehicles immediately before the monsoon: RTI activist Kedar Sanap urges the District Collector भुसावळ (26 जून 2026) : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील मुदत संपलेली व कालबाह्य वाहने अनेक ठिकाणी पडून असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही वाहने गंजून अधिक खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या मालमत्तेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या वाहनांचा तात्काळ लिलाव करण्यात यावा, अशी मागणी भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देत मागणी
या मागणी संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागांतील जुनी व कालबाह्य वाहने अनेक वर्षांपासून विविध शासकीय कार्यालयांच्या आवारात वापराविना उभी आहेत. पावसाळा सुरू झाल्याने या वाहनांना गंज लागून त्यांची अवस्था अधिक दयनीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या मालमत्तेची किंमतही दिवसेंदिवस घटत आहे.



या पार्श्वभूमीवर संबंधित वाहनांची तातडीने पाहणी करून नियमानुसार लिलाव प्रक्रिया राबविण्यात यावी. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत महसूल जमा होईल आणि पडून असलेल्या वाहनांमुळे होणारे आर्थिक नुकसानही टाळता येईल, असे सानप यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच या निवेदनावर करण्यात येणार्‍या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशीही विनंती त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. शासनाच्या निष्क्रिय मालमत्तेचा योग्य वापर करून महसूल वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !