मुंबईतील तोतया खासदाराचा ‘नंदनगरीत’ धुमाकूळ


बेकायदा भिंत तोंडताना बिंग फुटले : दोन पिस्तुलांसह 25 जिवंत काडतुसे जप्त

नंदुरबार- मुंबई खासदार असल्याचे भासवून एका महिलेसह तिच्या बाऊन्सर असलेल्या अंगरक्षक व मजुरांनी थेट एस.टी.महामंडळाची वादग्रस्त भिंत पाडण्यास शनिवारी पहाटे प्रारंभ केला मात्र पोलिसांच्या चौकशीत ही महिला खासदार नसल्याचे निष्पन्न झाले तर सुपारीपोटी हे काम घेतल्याची कबुली या महिलेने देत तिच्या सोबत असलेल्या बाऊन्सरकडून दोन पिस्तूल, एक मॅगझीन आणि 25 जिवंत काडतूसे जप्त केल्याने नंदनगरीत मोठी खळबळ उडाली.

आरोपींना अटक
बबिता वर्मा (रा.अंधेरी), विजय किसन देवरे, रा.खोरदड, जि.धुळे, अजित चंद्रकांत देसले (रा.वलवाडी, धुळे), वाल्मिक श्रीधर दराडे (रा.तिडके कॉलनी, नाशिक) अशी आरोपींची नावे असून नळवा येथील पाच मजुर आणि कॉम्प्लेक्स मालक यांच्यासह एकूण 10 जणांविरोधात परीवहन मंडळाचे मनोज पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. ही तोतया खासदार कोण? याची मात्र दिवसभर चर्चा सुरू होती.

बेकायदा भिंत पाडण्याचा प्रयत्न
नंदुरबार बसस्थानकाशेजारी साईप्लाझा कॉम्प्लेक्स असून परीवहन मंडळ व कॉम्प्लेक्स मालक रमेश चौधरी यांच्यात काही वर्षांपासून जागेचा वाद आहे. कॉम्प्लेक्सला लागून परीवहन मंडळाने आपल्या मालकीच्या जागेत भिंत बांधली असून ती पाडण्याचा प्रयत्न शनिवारी पहाटे काही मजुरांनी केल्यानंतर परीवहन मंडळाचे मनोज पवार यांना कळताच त्यांनी पोलिसांना कळवले. सुरुवातीला विचारणा केल्यानंतर पवार यांना महिलेच्या सोबत असलेल्या तिघांनी धक्काबुक्की केली. संबंधितानी आम्ही पोलिस असल्याचे सांगत थेट पि%E


कॉपी करू नका.