राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या


मुंबई (27 मे 2026) : राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस तसेच राज्य पोलीस सेवेतील काही अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश मंगळवारी काढले. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा विभागांमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे.

नव्याने काहींना पदस्थापना
या फेरबदलामध्ये काही अधिकार्‍यांच्या 21 मे रोजी झालेल्या बदल्या रद्द करून त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली आहे तर काही प्रतीक्षाधीन अधिकार्‍यांना महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अशा झाल्या आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या : कंसाबाहेर नवीन नियुक्तीचे ठिकाण

अरविंद चावरिया (प्रतीक्षाधीन) पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई

विनिता साहू (पोलीस उप महानिरीक्षक, मुंबई), अपर पोलीस आयुक्त, नागपूर

अरविंद साळवे (सह संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), पोलीस उपमहानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक , मुंबई

श्रीकांत परोपकारी (उपायुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई

श्रीकृष्ण कोकाटे (प्रतीक्षाधीन पोलीस अधीक्षक), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड

अमरसिंह जाधव (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर) 21 मे ची बदली रद्द करून पोलीस उपायुक्त, ठाणे शहर येथेच कायम

अमोल झेंडे (पोलीस अधीक्षक, पीएमआरडीए), पुणे 21मे 2026 ची मिरा भाईंदर वसई विरार येथील बदली रद्द करून, पोलीस अधीक्षक, पुणे येथेच कायम

निलेश सोनावणे (पोलीस उपायुक्त, वायरलेस कोस्टल डिव्हिजन, नवी मुंबई) 21 मे ची बदली रद्द करून, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे

रुपाली आंबुरे (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे), पोलीस अधीक्षक, डायल-112, नवी मुंबई

संदीप पालवे (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड) पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर (लोहमार्ग)

स्वाती भोर (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 12, हिंगोली) प्राचार्य- पोलीस प्रशिक्षण केंद्र, तासगाव (सांगली)

कविता नेरकर (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई), समादेशक- राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14, छत्रपती संभाजीनगर

वैशाली माने (पोलीस अधीक्षक, रा.गु.अ., पुणे) पोलीस उपायुक्त, मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालय

राज्य पोलीस सेवेतील अधिकार्‍यांची बदली
राज्य पोलीस सेवेतील भागीरथी भरत पवार यांची ‘सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर’ या पदावरून ’पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, लातूर’ या पदावर प्रशासकीय कारणास्तव तशत्काळ प्रभावाने बदली करण्यात आली.

दरम्यान, फेरबदलामुळे एटीएस, एसआरपीएफ, महामार्ग सुरक्षा आणि रेल्वे पोलीस दलाला नवीन आणि अनुभवी नेतृत्व मिळाले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !