चार हजारांची लाच घेताना नाशिक पशुसंवर्धन विभागाचा उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात
अनुदान खर्च प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी 41 हजारांची मागणी ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Nashik Animal Husbandry Department Deputy Commissioner Caught in ACB Net While Accepting a Bribe of ₹5,000. नाशिक (27 मे 2026) : महाराष्ट्र शासनाच्या परिपोषण योजनेंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या खर्च प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी तब्बल 41 हजार रुपयांची लाच मागून पाच हजारावर करीत लाच स्वीकारणार्या नाशिक पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या उपायुक्ताला एसीबीने अटक केली आहे. डॉ.प्रशांत रमेश धर्माधिकारी (58, बाणेर, पुणे, ह.मु.तिर्थनकार अपार्टमेंट, शिंगाडा तलाव, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव आहे. ते जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय), नाशिक येथे कार्यरत आहेत.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे श्री संत जनार्दन स्वामी सेवा संस्कारित संस्था संचलित मोनिगिरी गोशाळेचे विश्वस्त आहेत. संबंधित गोशाळेत 70 गायी असून महाराष्ट्र शासनाच्या परिपोषण योजनेंतर्गत संस्थेला अनुदान प्राप्त झाले होते. या अनुदानातून करण्यात आलेल्या खर्चाच्या प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी डॉ. धर्माधिकारी यांनी तक्रारदारांकडे 41 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानुसार तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारताना डॉ. धर्माधिकारी यांना नाशिक येथील त्यांच्या कार्यालयात रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस अंमलदार प्रफुल्ल माळी, विकास निकम यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांचा सहभाग होता. तपास पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार करीत आहेत.

