बोदवडमध्ये महाजनादेश यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले प्रत्येकाच्या जीवनात घडणार परीवर्तन
बोदवड : प्रत्येक गरीबाला घर, गॅस, रोजगार द्यायचा असून त्यासाठी पाच वर्षांसाठी पुन्हा जनादेश हवा आहे, समस्या निश्चित आहेत मात्र त्या पंतप्रधान मोदी व राज्य सरकार निश्चित सोडवणार असून प्रत्येकाच्या जीवनात परीवर्तन घडवायचे असल्याचा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांची शनिवारी दुपारी शहरात आगमन होताच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी केली तसेच ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे स्वागत केले.
सर्वात मोठी कर्जमाफी दिली
महाजनादेश यात्रेसाठी बनवण्यात आलेल्या विशेष वाहनातूनच त्यांनी माईकद्वारे जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने राज्यात भाजपा सरकार आले. शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपा सरकारने केले आहे. तीस हजार कोटींची सर्वात मोठी कज माफी शेतकर्यांना दिली, सहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बनवले, राज्यात 18 हजार तलावांचे काम आम्ही पूर्ण केले, काँग्रेसच्या काळातील सहा हजार हजार बंद शेततळ्यांचे पुर्नवसन भाजपा सरकारने केले, मोदींच्या नेतृत्वात देशात प्रत्येक घरात गॅस पोहोचला. माजी मंत्री खडसे हे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक असून युती सरकारच्या काळात खडसेंनी मार्गी लावलेल्या योजना काँग्रेसच्या काळात बंद पडल्या मात्र बंद पडल्या मात्र आम्ही त्या मार्गी लावल्या आहेत.
महाराष्ट्रात विकासपर्व -एकनाथराव खडसे
माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, पाच वर्षांपासून भाजपाचे सरकार, आल्यानंतर महाराष्ट्रात विकासपर्व आले आहे. 50 वर्षात जी प्रगती झाली नाही ते प्रगती गेल्या पाच वर्षात झाली असून दुष्काळी असलेला बोदवड तालुका विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. 41 गावांसाठी असलेल्या 48 कोटींच्या ओडीए योजनेला मंजुरी मिळवून ती योजना लवकरच पूर्ण केली जाईल शिवाय मुक्ताईनगर मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकास हेच आमचा ध्यास असून पुन्हा आपले सरकार आणूया, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सूत्रसंचालन केले. रथावर बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसेदेखी उपस्थित होत्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मुमताज बी.बागवान, उपनगराध्यक्ष दिनेश माळी, भाजपा नगरपंचायत गटनेते कैलास चौधरी, अनिल खंडेलवाल, रामदास पाटील, गणेश पाटील, सईद बागवान, मधुकर राणे, भानुदास गुरचळ, भागवत टिकरे यांच्यासह परीसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




