भुसावळातील डॉ.मानवतकर दाम्पत्याकडून पूरग्रस्तांना लाखाची मदत


मुख्यमंत्र्यांकडे सोपवला मदतीचा धनादेश

भुसावळ : महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहरातील प्रथितयश डॉ.राजेश मानवतकर व त्यांच्या पत्नी डॉ.मधू मानवतकर यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये मदतीचा धनादेश सोपवला. गोरगरीब रुग्णांसाठी अहोरात्र सेवा देणारे डॉ.मानवतकर कुटुंब संपूर्ण शहराला परीचीत आहे. विविध सामाजिक उपक्रमातून या दाम्पत्याने आपल्या कार्याचा ठसादेखील उमटवला आहे.

भुसावळ विधानसभेसाठी डॉ.मधू मानवतकर इच्छूक
सूत्रांच्या माहितीनुसार डॉ.मधू मानवतकर या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. मुख्यमंत्र्यांची दाम्पत्याने शनिवारी भेट घेवून चर्चादेखील केल्याचे समजते. भाजपाकडून डॉ.मधू मानवतकर तिकीटासाठी आग्रही असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला तर भाजपाकडून तिकीट न मिळाल्यास अन्य पक्षातून वा अपक्षदेखील त्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.


कॉपी करू नका.