जळगावात हाणामारी : सहा आरोपींना अटक
चिकूचे पैसे मागितल्यावरून उफाळला वाद : जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी
जळगाव : चिकूचे पैसे मागितल्यावरून वाद उफाळल्याने 24 रोजी दहा वाजेच्या सुमारास नेरी नाका पांजरपोळ संस्थेजवळ तक्रारदार अबिद बिस्मिल्ला बागवान (38, फ्रुट विक्री, रा.कासम वाडी जळगाव) यांना आरोपींनी शिवीगाळ करीत चापट बुक्यांनी मारहाण करीत गंभीर दुखापत केली होती. या प्रकरणी सहा आरोपींच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.
या आरोपींना केली अटक
लोकेश विलास अत्तरदे, मोहन ईश्वर पाटील, हर्षल धर्मरत्न सोनावणे, विजय गणेश कांडेलकर, राहुल संजय पवार, सागर उर्फ दिनेश प्रभाकर दुसाने यांना रविवारी पहाटे 5.20 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या नेतृत्वात आरोपींना अटक करण्यात आली.