अमळनेरात चोरी करणारा अट्टल चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : अमळनेरातील चोरीच्या दोन गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या अट्टल आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. प्रवीण रणछोड पाटील (28, रा.बिडगाव, ता.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, प्रकाश महाजन, अनिल इंगळे, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, दादाभाऊ पाटील, विजय शामराव पाटील, सचिन महाजन, दत्तात्रय बडगुजर, इंद्रीस पठाण, दर्शन ढाकणे आदींनी आरोपीच्या गोपनीय माहितीवरून मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.