भुसावळात एकाचवेळी सात दुकाने फोडली
भुसावळ : शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तार ऑफिस रस्त्यावर चोरट्यांनी सहा ते सात दुकानांचे शटर तोडून हजारो रुपयांची रोकडसह अन्य साहित्य लांबवले. रविवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेने दुकानदारांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. एकाचवेळी या चोर्या झाल्या असून चोरटे सराईत असल्याचा दाट संशय आहे. पोलिसांची गस्त शहरात नावालाच ठरत असून चोर्या-घरफोड्या वाढल्याने नागरीकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.