लक्झरी-गॅस टँकरची समोरा-समोर धडक : तिघांचा मृत्यू


मुकटी गावाजवळ भीषण अपघात : अपघातानंतर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

मुकटी : भरधाव लक्झरी व गॅस टँकरमध्ये समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच ते तीन दरम्यान घडली. मुकटी गावापासून जवळच असलेल्या महामार्गावरील काटसरनजीक हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने त्यात तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले तर या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीदेखील भीती व्यक्त होत आहे. समोर-समोर दोन्ही वाहने भरधाव वेगात आदळल्याने डिझेल टाक्या फुटल्याने गॅस टँकरचा पुढील भागासह चाके जळाली तसेच तर संपूर्ण लक्झरीदेखील पेट घेतला. रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे कळू शकली नाही. धुळे तालुक्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रीत केली. तत्पूर्वी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !