पत्नीसमोरच मारहाण करीत पतीची हत्या : सहा आरोपींना बेड्या
Wife Murdered in Front of Her Husband: Six Accused Arrested मुंबई (14 एप्रिल 2026) : शाब्दीक वादाचे हिंसक वादात रुपांतर झाल्यानंतर टोळक्याने पत्नीसमोरच केलेल्या मारहाणीत 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवला. मुंबईच्या दादर परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या हल्ल्यात अंकुश आंबोरकर या तरुणाचा मृत्यू झाला. गौरव सणस आणि त्याच्या टोळक्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होताच आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.
काय घडले मुंबईत ?
रविवारी रात्री अंकुश आंबोरकर दादर येथे आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले असताना, संशयित आरोपी गौरव सणसने त्यांना रस्त्यात अडवले. या वेळी उभयतांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हिंसक वळणात झाले आणि गौरवने आपल्या साथीदारांसह अंकुश यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, अंकुश यांची पत्नी प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत अज्ञसीफ पतीला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अंकुश यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले.

गर्दी जमताच टोळके पसार
मारहाणीमुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमू लागल्याने गौरव सणस आणि त्याचे टोळके तिथून पसार झाले. माहिती मिळताच दादर पोलिस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अंकुश यांना उपचारासाठी तातडीने केईएम रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी मृत अंकुश यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
खुनाला जुन्या वादाची किनार
अंकुश आंबोरकर आणि गौरव सणस यांच्यातील वादाची पाळेमुळे त्यांच्या जुन्या व्यावसायिक वादात आहेत. पूर्वी एकत्र बँजो व्यवसाय करणार्या या दोघांमध्ये 2017 मध्ये फूट पडल्यापासून तीव्र वितुष्ट निर्माण झाले होते. स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यामुळे सुरू झालेल्या या स्पर्धेतून गौरव अंकुशवर सातत्याने राग धरून होता आणि त्याला टोमणे मारण्यासह धमकावत असे, ज्याबाबत यापूर्वीही दादर पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे वैयक्तिक वैर अखेर हत्येपर्यंत पोहोचले.


