अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलाने केला पित्याचा खून


कुंबीपाड्यातील घटना : आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात

शिरपूर : वडिलांचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातूनच मुलानेच आपल्या वडिलांचा कुर्‍हाडीने खून केल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ वाजता शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायत अंतर्गत कुंबीपाडा येथे घडली. या घटनेत अत्तरसिंग गीलदार पावरा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताची पत्नी रमाबाई पावरा यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा तथा संशयत आरोपी बिनाज्या पावराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली.

संशय बेतला जीवावर
आरोपी बिनाज्या पावराला आपल्या वडिलांचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता व त्यातूनच त्याने गुरुवारी रात्री वडिल अत्तरसिंग पावरा यांच्या गळ्यावर कुर्‍हाडीने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !