राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल 84.48 टक्के निकाल


जळगाव (5 मे 2026) : राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे एच.एस.सी. परीक्षा 2026 चा निकाल जाहीर झाला आहे. विद्यालयाने 84.48 टक्के यश प्राप्त केले आहे. एकूण 59 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. असे शाळेचे मुख्याध्यापक एस.टी. चिंचोले यांनी कळविले आहे.

यांनी मिळवले यश
विद्यालयातील पहिल्या पाच यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नेहा शांताराम कुरंगे यांनी 77 टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले तर अभिषेक सुभाष जोशी 74.33%, कु. सुवर्णा विनोद वाघ 72.83%, रशीद शेरखा तडवी 72.67% आणि कु. दिशा गौतम खरे यांनी 72.17% गुणांसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यालय व्यवस्थापनाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. शिक्षण हेच कर्म, समाजसेवा हाच धर्म या मूल्यावर चालणार्‍या या संस्थेने जिल्ह्यात आपली छाप सोडली आहे.



स्व.बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्याशंभर टक्के निकाल
स्व. बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या बाबतची माहिती प्राचार्या रूपाली वाघ यांनी दिली. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे जन्मगाव असलेल्या वाकोद येथे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या ज्युनिअर कॉलेजच्या बारावीची सायन्सची ही तुकडी असून. विद्यार्थ्यांची मेहनत, सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच जैन परिवाराचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यामुळे हे यश शक्य होऊ शकले.

यात वैष्णवी राजेंद्र पाटील प्रथम, ममता राजपूत व प्रेम सावळे द्वितीय तर धनश्री डेरे तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन यांनीही संस्थेकडे विशेष लक्ष दिले, शिवाय शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास यामुळे हे यश मिळू शकले, असे प्राचार्या वाघ यांनी नमूद केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !