जळगाव जिल्ह्यात आयपीएलवर सट्टा : 10 लाखांच्या मुद्देमालासह टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
IPL Betting Racket Busted in Jalgaon District: Gang Apprehended by Crime Branch with Seized Goods Worth ₹10 Lakhs जामनेर (10 मे 2026) : जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोडवरील एका घरात काही इसम आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने छापेमारी करीत 10 लाख 53 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने सटोडियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
लाखोंचा मुद्देमाल जप्त
लाईव्ह ट्रेंड न्यूजच्या वृत्तानुसार, पोलिसांनी नऊ लाख दोन हजार 300 रुपयांची रोकड, एक लाख 30 हजार रुपये किंमतीचे मोबर्इाल, 25 हजार रुपये किंमतीचा टीव्ही व साउंडबार तसेच 41 एटीएम कार्ड जप्त केले. मुद्देमालाची एकूण किंमत 10 लाख 53 हजार 800 रुपये इतकी आहे. एलसीबीच्या पथकाने देवानंद सुभाष सोनवणे (जामनेर), रितेश अशोक नेरकर (जामनेर), परीक्षीत रवींद्र पाटील, (जामनेर), प्रवीण जगन्नाथ टहाकडे (जामनेरम या चौघांना ताब्यात घेत त्यांच्यविरोधात गुन्हा दाखल केला.


जळगाव जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा जोमात
आयपीएल हंगामादरम्यान क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सट्टेबाजी सुरू आहेत तर जिल्ह्यात या सट्ट्याला पेव फुटले आहे. जामनेरमधील ही कारवाई सट्टेबाजांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.
