यावल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत : 39 प्रकरणात निपटारा, 4.87 लाख रुपये वसुल
यावल (10 मे 2026) : यावल शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार. 9 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यात राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज विधी सेवा समितचे अध्यक्ष तथा प्रथमवर्ग न्या.आर.एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहदिवानी न्या.जी.आर.कोलते यांच्या पॅनल समोर चालले पॅनल. पंच वकील अॅड.याकुब तडवी यांची उपस्थिती होती.
39 प्रकरणात निपटारा
या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ग्रामपंचायत, बीएसएनएल, विविध बँका, वित्तीय संस्था व राज्य विद्युत वितरण कंपनीचे बिलांचे दाखल पूर्व प्रकरणे तसेच दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे न्याय प्रलंबित एकूण दोन हजार 117 प्रकरण ठेवण्यात आले. या प्रकरणापैकी 39 प्रकरणात निपटारा करण्यात आला व यातून चार लाख 87 हजार 461 रुपये वसुल करण्यात आले.


या लोक अदालतीत सकाळ पासुनचं पक्षकारांची गर्दी झाली होती. स्थानिक वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.कवडीवाले, अॅड.गौरव पाटील, धीरज चौधरी, के.डी.सोनवणे, रियाज पटेल, अतुल भास्कर, अजय कुळकर्णी, आकाश चौधरी, असलम खान, रितेश बारीसह संपुर्ण स्थानिक वकील मंडळी व विधी सहाय्यक अजय बडे यांच्या माध्यमातून या सर्व दाखल प्रकरणात तडजोेडीकरिता पुढाकार घेण्यात आला.
यशस्वीतेसाठी न्यायालयाचे लघू लेखक आर.एस.बडगुजर, आर.व्ही.आमोदकर, एस.आर.तडवी, एस.एस.पठाण,एम.एस.सोनवणे, डी.जे.पाटील, एस.एस.झांबरे, पी.व्ही.जाधव, ए.बी.पाटील, बी.डी.बागुले, राम अहिरे सह आदींनी परिश्रम घेतले.