जळगावात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : डमी ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांची छापेमारी ; एका आरोपीला अटक
Sex Racket Busted in Jalgaon: Police Raid Follows Signal from Dummy Customer ; One Accused Arrested जळगाव (10 मे 2026) : शहरातील मध्यवर्ती टॉवर चौक परिसरातील एका लॉजमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एचटीयू) संयुक्त कारवाई केली. यावेळी पीडीतांची सुटका करीत त्यांना समुपदेशानासाठी पाठवण्यात आले तर संबंधित लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवणार्या राजू मोतीराम जोशी याला पोलिसांनी अटक केली.
ग्राहकाचा इशारा अन पोलिसांची कारवाई
संबंधित लॉजमध्ये अनेक दिवसांपासून अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबी आणि एचटीयूच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा संयुक्त कारवाईची योजना आखली. पोलिसांनी प्रथम डमी ग्राहक संबंधित लॉजमध्ये पाठवला. तेथे पैशांची बोलणी झाल्यानंतर डमी ग्राहकाने पूर्वनियोजित इशारा दिला.


इशारा मिळताच बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने लॉजवर अचानक धाड टाकली. या कारवाईत लॉजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय रंगेहाथ उघडकीस आला. पोलिसांनी लॉज व्यवस्थापकासह काही संशयित दलालांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून काही महिलांची सुटका करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी लॉजमधून काही रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर साहित्य जप्त केले. सुटका करण्यात आलेल्या महिलांना संरक्षण व समुपदेशनासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी संबंधितांविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.