घुसखोरी ऐरणीवर : जळगावात बांग्लादेशी महिलेला पोलिसांच्या बेड्या


Infiltration bid: Bangladeshi woman handcuffed by police in Jalgaon जळगाव (11 मे 2026) : बांग्लादेशातून अवैध मार्गाने जळगावात डेरा टाकून असलेल्या महिलेसह तिला आश्रय देणार्‍याला जळगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणानंतर जळगावात अवैधरित्या बांग्लादेशींचा रहिवास असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दोघांना पोलिसांकडून अटक
जळगाव जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी झाल्याची उदाहरणे आधी देखील काही प्रमाणात दिसून आली होती. आता पोलिसांनी केलेल्या कारवाईत अशाच प्रकारे अवैध पध्दतीने राहणार्‍या महिलेला तिच्या आश्रयदात्यासह बेड्या ठोकल्या आहेत.



गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिपेठ पोलीसांना जोशीपेठ भागात बांगलादेशाची एक महिला वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने छापा टाकला असता कोनीकारानी जगदीशचंद्र राय (20) ही मूळची बांगलादेशाची नागरिक असणारी महिला वास्तव्यास असल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे मूळचा बांगलादेशी आणि सध्या जळगावकर असलेल्या चिन्मय जगन्नाथ वाला या इसमाने तिला आश्रय दिला असल्याचे या तपासातून उघड झाले.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने या दोघांना अटक केली व गुन्हा दाखल केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !