भुसावळात कुत्र्यांनी लचके तोडल्याने नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू : खन्ना कोळीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा


Nine-Year-Old Child Dies After Being Mauled by Dogs in Bhusawal : Case of Culpable Homicide Registered Against Khanna Koli भुसावळ (14 मे 2026) : शाळेत निघालेल्या नऊ वर्षीय तारुष विशाल झोपे या बालकावर अचानक कुत्र्यांनी हल्ला करीत त्याचे लचके तोडले होते तर उपचारानंतर बालकाचा रेबीज होवून त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी कुत्रे मालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या संतप्त भावनेनंतर शहर पोलिसांनी दखल घेत कुत्रे मालक प्रकाश कोळी विरोधात शहर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे तर त्यांच्याकडील कुत्रे ताब्यात घेतले आहेत.

असे आहे प्रकरण
भुसावळच्या नारायण नगरातील रहिवासी विशाल झोपे यांचा मुलगा तारुष विशाल झोपे (9) हा 24 एप्रिल रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार होऊन घराच्या बाहेर गाडीची वाट पहात उभा होता, यावेळी त्याची आई त्याची वॉटर बॅग घेण्यासाठी घरात गेली, याच वेळी कुत्र्यांच्या टोळक्याने तारकेश याच्यावर अचानक हल्ला चढविला. मुलाच्या ओरडण्याने त्याची आई भावना झोपे या घरातून बाहेर आल्या त्यांनी कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल मात्र कुत्रे तारकेश याला सोडायला तयार नव्हते, यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, आणि तारकेश याला कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचविले, मात्र, कुत्र्याच्या हल्ल्यात तारकेश हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जळगावात उपचार झाल्यानंतर त्यास घरी आणण्यात आले मात्र सोमवारी पुन्हा त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला मुंबईत उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असतांना तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर वरणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.







प्रकाश कोळी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
यावेळी संतप्त नातेवाईकांनी दोषीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. मयत तारुष आई भावना विशाल झोपे (36, नारायण नगर, भुसावळ, मूळ रा.वरणगाव) यांनी फिर्याद दिल्यानंतर प्रकाश उर्फ खन्ना एकनाथ कोळी (भिरुड कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !