जळगावच्या दाम्पत्याचा दरीत दुचाकी कोसळल्याने मृत्यू


Couple from Jalgaon dies after their two-wheeler plunges into a gorge जळगाव (14 मे 2026) : दुचाकीवरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळल्याने जळगावातील दाम्पत्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मुजफ्फर अली सय्यद बबन अली व पत्नी ताहेराबी मुजफ्फर अली सय्यद (गुलशन रजा कॉलनी, आझाद नगर, जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. मुळातच हा अपघात 25 मार्च 2026 रोजी घडला असलातरी 13 मे रोजी या अपघाताची नोंद करण्यात आली.

नियंत्रण सुटल्याने अपघात
मुजफ्फर अली सय्यद हे पत्नीसह 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ज्युपिटर दुचाकी (एम.एच.19 ई.जे.3892) ने फर्दापूर ठाणगाव येथून जळगावकडे येत असताना जळगाव ते संभाजीनगर रोडवरील उमाळा घाटाच्या उतारावर वाहन चालवत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगामुळे दुचाकी रस्त्यालगतच्या दगडावर आदळून थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात मुजफ्फर अली सय्यद व त्यांच्या पत्नी ताहेराबी यांचा मृत्यू झाला.







या प्रकरणी गुलाम अली सय्यद मुजफ्फर अली सय्यद (वय 38, रा. गुलशन रजा कॉलनी, आझाद नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिल्यावरुन मृत चालक मुजफ्फर अली सय्यद बबन अली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन महाजन करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !