भरधाव दुचाकी इलेक्ट्रिक पोलवर आदळली : भुसावळ तालुक्यातील भानखेड्याचा युवक ठार


Speeding Two-Wheeler Crashes into Electric Pole : Youth from Bhankheda in Bhusawal Taluka Killed भुसावळ (16 मे 2026) : भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात भुसावळ तालुक्यातील भानखेड्यातील युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार, 12 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास साकेगाव-जोगलखेडा रस्त्यावर घडला. ज्ञानेश्वर विठ्ठू सोनवणे (34, रा.भानखेडा, ता.भुसावळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
ज्ञानेश्वर विठ्ठू सोनवणे (34, रा.भानखेडा, ता.भुसावळ) हा तरुण होंडा शाईन (एम.एच.19 ए.जे. 3447) दुचाकीवरून साकेगावकडून जोगलखेडा-भानखेडा गावाकडे जात असताना जोगलखेडा शिवारातील किशोर पाटील यांच्या शेतालगत त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोलवर आदळली. या अपघातात ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मयत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात हवालदार संजय काशीनाथ भोई यांच्या फिर्यादीवरून मयताविरोधात गुन्हा इाखल करण्यात आला. हा अपघात हा वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !