एरंडोल परिसरातून ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी जाळ्यात : दोन ट्रॅक्टर जप्त
जळगाव गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून कारवाई : दोन संशयीताना अटक
Tractor-Theft Gang Operating in Erandol Area Busted : Two Tractors Seized जळगाव (16 मे 2026) :शेतीचा हंगाम सुरू असतानाच एरंडोल परिसरातून दोन ट्रॅक्टर लांबवण्यात आल्याने शेतकर्यांच्या गोटात भीती पसरली होती. एरंडोल पोलिसात दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एरंडोल परिसरातील टोळीचा पर्दाफाश केला. दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून दोन गुन्हे उघडकीस आले आहे व ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले. ताब्यातील एक संशयीत अल्पवयीन असून त्यांचे दोन साथीदार पसार आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 44/2026 व 84/2026 असे ट्रॅक्टर चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. सलग घडलेल्या या घटनांमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षका श्रीकांत धीवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी विखरण (ता.एरंडोल) येथील विकी देवरे व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी साथीदार गणेश भिकन गोसावी व प्रवीण भाईदास कोळी (दोघे रा. विखरण, ता.एरंडोल) यांच्या मदतीने ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर जप्त केले असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरिलाल पाटील, पोलीस कर्मचारी राहुल कोळी, महेश पाटील, सागर पाटील, भूषण शेलार आणि चालक बाबासाहेब पाटील आदींच्या पथकाने केली.









