धक्कादायक ! पतीसह भावाच्या मदतीने बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या : समोर आले ‘धक्कादायक’ कारण
Shocking! Boyfriend Brutally Murdered with the Help of Husband and Brother: ‘Shocking’ Motive Revealed साक्री, जि.धुळे (16 मे 2026) : महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंब्रा परिसरात घडली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह एका ड्रममध्ये भरून नाल्यात फेकून दिला. मुंब्रा पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे या संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश केला.
काय आहे प्रकरण ?
मुंब्रातील रहिवासी अरबाज मकसून अली खान हा नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघाला मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर त्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात अरबाज बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ अरबाजचे कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन तपासण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली
तपासादरम्यान पोलिसांना अरबाजचे शेवटचे लोकेशन वर्सोवा परिसरात मिळून आले. विशेष म्हणजे, याच भागात त्याची गर्लफ्रेंड मेहजबीन शेख हिचेही लोकेशन आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती पोलिसांची दिशाभूल करत होती, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण
मेहजबीनने दिलेल्या कबुलीनुसार, तिने तिचा पती हसन आणि भाऊ तारिक शेख यांच्यासोबत मिळून अरबाजकडून पैसे उकळण्याचा आणि त्याची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यानुसार त्यांनी अरबाजला पैशांच्या व्यवहारासाठी वर्सोवा येथे बोलावून घेतले. अरबाजने पैसे देण्यास नकार देताच आरोपींनी त्याचे हात-पाय बांधले आणि प्लास्टिकच्या पाईपने त्याला बेदम मारहाण केली. या भीषण मारहाणीत अरबाजचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह कोंबला हिरव्या ड्रममध्ये
अरबाजचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये कोंबला. हा ड्रम त्यांनी मुंब्रा येथील एका निर्जन भागात असलेल्या नाल्यात आणून फेकून दिला. मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी महिला मेहजबीन शेख आणि तिचा भाऊ तारिक शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, मेहजबीनचा पती हसन आणि त्याचा साथीदार मुजम्मल पठाण हे दोघे सध्या फरार आहेत.









