मनुष्याने विवेकाने वागले पाहिजे : स्वामी रमेशानंद


भुसावळ (19 मे 2026) : श्रीमद् भागवत महापुराण सप्ताहाच्या निमित्ताने वाचक म्हणाले की मनुष्याचे आचरण शुद्ध असायला हवे. यासाठी विचार, आहार, विहार आणि प्रत्येक कृती विवेकाने केली तर मनुष्याकडून वाईट कृती होणारच नाही. अशा वेळी चांगल्या कृतीचे परिणाम ही चांगलेच होतात. भागवत महापुराण ही एक प्रकारे मनुष्यासाठी उत्तम आचार संहिता आहे. मनुष्याच्या कल्याणासाठीच असे ग्रंथ उपयोगी असतात. देहाने प्रपंचात असावे परंतु मनाने ईश्वराजवळ असावे. असे तत्वज्ञान सांगणारे हे शास्र अधिक लोकप्रिय आहे.

याच नामाने वाल्याचा वाल्मीक ऋषी झाले. ध्रुव बाळाचा उद्धार झाला. असे कितीतरी उदाहरणे देऊन नामाचे महात्म्य त्यांनी पटवून दिले. निनू खर्चे यांच्या परिवाराने अधिक मासाचे निमित्त साधून. 17 मे ते 23 मे पर्यंत शहरातील वेडीमाता परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने श्रोते याचा लाभ घेत आहेत. दुपार सत्रात सप्ताह सुरू आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !