नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एका ‘मनीषा’ला अटक

भौतीकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याचा आरोप : मोठ्या रॅकेटचे आणखी काही धागेदोरे उघड होण्याची शक्यता


Another ‘Manisha’ Arrested from Pune in NEET Paper Leak Case पुणे (22 मे 2026) : देशभरात गाजत असलेल्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात नव्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. भौतीकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याप्रकरणी मनीषा संजय हवालदार या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पुण्यातील कारवाईने खळबळ
पुण्यातील सेठ हिरालाल सर्फ प्रशालेत कार्यरत असलेल्या मनीषा हवालदार हिला सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून अटक केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तिची पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती, ज्यामुळे तिला भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत सहज पोहोचता येत होते. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मनीषा मांढरे हिच्या संगनमताने तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते आणि तपासादरम्यान हेच लीक झालेले प्रश्न प्रत्यक्ष नीटच्या प्रश्नपत्रिकेत आल्याचे निष्पन्न झाले आहे.




सीबीआयकडून अटकसत्र सुरूच
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 मे रोजी नीट-यूजी परीक्षेचे आयोजन केले होते मात्र पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती रद्द करून आता ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाणार आहे. या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करीत आहेत. त्यांनी धडक कारवाई करत आपले अटकसत्र सुरू ठेवले आहे. मनीषा हवालदार हिच्या अटकेच्या रूपाने सीबीआयने पुण्यातून केलेली ही अकरावी मोठी कारवाई आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !