बोदवड शहरात तरुणाची हत्या : अन्य दोन पसार आरोपींनाही अटक


बोदवड (22 मे 2026) : बोदवड शहरातील तरुणाच्या हत्या प्रकरणात मुख्य संशयीताला अटक करण्यात आल्यानंतर अन्य दोन संशयीत पसार झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी जनभावना संतप्त असतानाच शुक्रवारी बोदवड पोलिसांनी अन्य पसार दोन आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद शाह व ईसराईल शाह (दोन्ही रा.बोदवड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे खून प्रकरण
घरातील चोरी प्रकरणात घराजवळील एकावर संशय व्यक्त केल्याच्या रागातून बोदवडला तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार, 20 मे रोजी घडली. अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सूरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव होते. या प्रकरणी सुरुवातीला अरबाज शाह या आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




खुनापूर्वी सोशल मिडीयावर टाकले स्टेटस
शहरातील हिदायत नगरातील अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सूरी) यांच्या घरात गत आठवड्यात चोरी झाली होती त्यात तीन ते चार लाख रुपयांचा मुद्देमाल गेला होता. त्यात त्यांनी बोदवड पोलिसात तक्रार दिल्यानंतर घराजवळील काहींवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी संबंधिताची चौकशी करून त्यांना सोडून दिले होते मात्र संशयीत अरबाज याने तक्रारदाराला अडवत पोलिसांकडे आपले नाव का सांगितले? म्हणत दम भरत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. मयताने याबाबतही पोलिसांना कल्पना दिल्यानंतर आरोपींवर ठोस कारवाई न झाल्यास खुनाची घटना घडली.

पोलिसांविरोधात रोष : सहा.निरीक्षकांसह तिघे निलंबित
पोलीस प्रशासनाने आरोपीविरोधात योग्य कारवाई न केल्याने जमावाने तीव्र रोष व्यक्त करीत कारवाईची मागणी केली होती तर शुक्रवारीदेखील जमावाने कारवाईबाबत यंत्रणेला विचारणा केल्यानंतर
बोदवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, एएसआय रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबित केले तर संबंधिताची आता चौकशीदेखील होणार आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !