यावल शहरातील व्यापार्याचे 18 हजार लूटले : त्रिकूटाविरोधात गुन्हा
Trader from Yawal City Robbed of ₹18,000: Case Registered Against Trio यावल (23 मे 2026) : शहरातील का व्यापार्याला लूटण्यात आले होते. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. आसीफ बशीर तडवी (बोरावल गेट) आणि दोघे अनोळखी साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातील किरकोळ छोट्या दुकानदारांना विक्री केलेल्या गोळ्या बिस्किटांचे मालाची पैशांची वसुली करून फिर्यादी प्रमोद जगन्नाथ बुरुजवाले हे जात असताना त्यांच्या ओळखीचा असलेला आरोपी आसीफ बशीर तडवी हा त्याचे इतर दोघे अनोळखी साथीदारांसोबत आला व त्याने व्यापार्याची कॉलर पकडून त्याच्याकडे पैशांची बळजबरीने मागणी केली तसेच शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्या खिशातील 18 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून पोबारा केला होता.










