यावल वनविभागाची मोठी कारवाई : कोळशाची विनापरवाना वाहतूक करणारा ट्रक जप्त


Major Action by Yawal Forest Department : Truck Transporting Coal Without Permit Seized यावल (23 मे 2026) : यावल वन विभागाच्या यावल पश्चिम व हरिपुरा राऊंड स्टाफने यावल-किनगाव रस्त्यावर गस्तीदरम्यान विनापरवाना कोळशाने भरलेला ट्रक जप्त केला आहे. 21 मे रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. दहा लाखांचा ट्रक व सुमारे चार लाख रुपये किंमतीचा त्यात कोळसा असल्याचे सांगण्यात आले.

गस्तीदरम्यान पथकाची कारवाई
यावल पश्चिम व हरिपुरा राऊंड स्टॉप यावल ते किनगाव रस्त्याने गस्त करत असताना कोळशाची अवैध वाहतूक करीत असल्याचा संशयावरून वाहन (क्रमांक एम.एच.19 सी.एक्स 4149) अडवून तपासणी केली असता गाडीमध्ये कोळसा वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. वाहतुकीबाबत पास परवान्याची विचारणा केली असता तो नसल्याने वाहन चालक घाबरून पसार झाला. वाहन वनविभागाने जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला.





यांनी केली कारवाई
ही कारवाई यावल उपवनसंरक्षक सौरीष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्प यावल विभागाचे समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपुरा वन परिमंडळ अधिकारी संजय इंडे, हरिपुरा वनरक्षक सुधीर पटणे, योगेश मुंडे, सरला भोंगरी आदींच्या पथकाने केली.

वनविभागाच्या कारवाईकडे लागले लक्ष
जप्त ट्रक कुठला ?ट्रकचा मालक कोण ?कोळसा कुठून आणला ?गाडीमध्ये किती कोळसा भरलेला होता ?विना परवाना वाहतूक करताना त्याला कोणत्या अधिकार्‍याने आशीर्वाद दिला ?असे वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित होत आहे. यावल पश्चिम वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !