भालोदला विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला

ओळख पटवण्याचे आवाहन : फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद


यावल (23 मे 2026) : यावल तालुक्यातील भालोद गावातील एका विहिरीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. विहिरीजवळच महिलेची पर्स आणि चप्पल आढळली असून फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन फैजपूर पोलिसांनी केले आहे.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
यावल तालुक्यातील भालोद गावातील शेतकरी किशोर महाजन यांचे भालोद शेत शिवारात शेत गट क्रमांक 538। 540 आहे. यामध्ये असलेल्या विहिरीत एका अनोळखी 65 ते 70 वयोगटातील महिलेचा मृतदेह मिळून आला. याची माहिती तातडीने फैजपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले, पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





पुढील तपास फैजपूरचे पोलीस उपनिरीक्षक मैयनोद्दीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास सुरदास करीत आहे. तर मयत महिलेची पर्स आणि चप्पल ही विहिरीजवळ मिळून आली आहे व त्या वरून या महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन फैजपूर पोलिसांनी केले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !