बोरावल बुद्रुक शेत-शिवारात केळीच्या शेताला आग : दिड लाखांचे नुकसान
यावल (23 मे 2026) : यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक शेत शिवारात राजोरा येथील शेतकर्याच्या केळीच्या शेतात अचानक आग लागली. यात शेतकर्याची कापणी योग्य केळी, ठिबक नळ्या, पाईप असे जळून खाक झाले. आगीत तब्बल दिड लाखांचे नुकसान झाले असून आगीचे कारण झालेले नाही.
साडेतीन हजार केळी खोडांचे नुकसान
बोरावल बुद्रुक, ता.यावल येथील शेत-शिवारातील महेंद्र जगन्नाथ कोळी (रा.राजोरा, ता.यावल) यांचे शेत आहे. त्यांच्या शेत गट क्रमांक 177 मध्ये त्यांनी तीन हजार 500 केळी खोडांची लागवड केली होती. आता केळी बाग बहरला होता व केळी कापणी योग्य झाली होती. दरम्यान शनिवारी सकाळी त्यांच्या केळी बागेला अचानक आग लागली. यात कापणीयोग्य झालेल्या केळी झाडावरील घड तसेच ठिबक नळ्या व पाईप असे साहित्य जळून खाक झाले.










