वाघझिराजवळ मालवाहू वाहन व दुचाकीचा भीषण अपघात : किनगावातील चालक ठार, एक गंभीर
Horrific Accident Near Waghzhira Involving Cargo Vehicle and Two-Wheeler: Driver from Kingaon Killed, One Critically Injured यावल (24 मे 2026) : यावल तालुक्यातील वाघझिरा गावाजवळ वाघझिरा ते चिपखेडा जाणार्या रस्त्यावर दुचाकी आणि पिकअप मालवाहू वाहनाचा अपघात घडल्यानंतर किनगावातील 34 वर्षीय दुचाकीस्वार तरुण हा ठार झाला व सोबत असलेला एक जण हा गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवार, 23 मे रोजी सायंकाळी घडला. अपघातप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
किनगावातील चालकाचा मृत्यू
वाघझिरा येथूनच चिपखेडा जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर शनिवारी सायंकाळी मालवाहू वाहन (क्रमांक एम.एच.19 सी.वाय. 0885) घेऊन आरीफ खान सलीम खान (रा.किनगाव) हा चालक जात होता. दरम्यान वाघझिराकडून चिपखेडा येथे दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 ए.सी. 31173) घेऊन दिलीप मंगल भील (34) व अनिल रूपला बारेला हे दोघे जात असताना दोन्ही वाहनांचा अपघात घडला. या अपघातामध्ये दिलीप भील हा जागीच ठार झाला तर अनिल बारेला हा गंभीर जखमी झाला.



अपघातानंतर किनगावात शोककळा
अपघातानंतर तातडीने दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दुचाकी वाहन आणि मालवाहू चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमीवर यावलला प्रथम उपचार करून जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात धनराज भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालवाहू वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूने किनगावात हळहळ व्यक्त करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार मोहन तायडे, राजेंद्र पवार करीत आहे.







