आता पुन्हा मारणार नाही म्हणत लिव्ह ईन पार्टनरला बोलावत मध्यरात्री केली हत्या


Luring her live-in partner back with the promise, “I won’t hit you again,” he murdered her at midnight. कल्याण (24 मे 2026) : लिव्ह इनमध्ये राहणारा प्रियकर सातत्याने मारहाण करीत असल्याने तरुणी माहेरी निघून आली मात्र तरुणाने पुन्हा मारणार नाही म्हणत प्रेमाने गळ घातल्याने तरुणी पुन्हा प्रियकराकडे परतली मात्र मध्यरात्री उभयंतात पुन्हा भांडण झाल्यानंतर आरोपीने तरुणीच्या डोक्यात टीव्ही व पाण्याने भरलेला हंडा टाकून तिची हत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना कल्याण आंबिवली बनेलीत घडली. रुक्सार अन्सारी असे मयत तरुणीचे नाव तर सतीश उर्फ गुड्डू वाघे असे हत्या करणार्‍या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली.

असे आहे हत्या प्रकरण
आंबिवली परिसरातून ही सुन्न करणारी घटना घडली. सतीश हा रुक्सारसोबत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होता मात्र अलीकडे तो चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. दोन दिवसांपूर्वीच त्याने रुक्सारला जबर मारहाण केल्याने ती कंटाळून आपल्या आई-वडिलांच्या घरी निघून आली होती. शनिवारी सायंकाळी आरोपी सतीशने मी तुला पुन्हा मारणार नाही, आपण प्रेमाने संसार करू असं खोटं सांगून रुक्सारला विश्वासाने आपल्या घरी बोलावून घेतलं.




मध्यरात्री केला खून
मध्यरात्री पुन्हा उभयंतांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर आरोपीने रुक्सारला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता घरातला टीव्ही आणि पाण्याने भरलेला तांब्याचा हंडा तिच्या डोक्यात मारून तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या घटनेनंतर गंभीर जखमी रुक्सारला घेऊन तिचे नातेवाईक आधी टिटवाळा ग्रामीण रुग्णालयात घेवून गेले मात्र तिथे अत्यंत आवश्यक असलेला ‘ऑक्सीजन’ उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी तिला दुसर्‍या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्यानंतर उल्हासनगर सेंट्रल रुग्णालयात हलवल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आरोपीला रुग्णालयाबाहेरच चोपले
आपली मुलगी दगावल्याचे समजताच कुटुंबाचा धीर सुटला. याचवेळी आरोपी सतीश हा सेंट्रल रुग्णालयाच्या बाहेरच संशयास्पदरित्या घुटमळत असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यास बेदम चोप देण्यात आला व टटवाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी आरोपी सतीश उर्फ गुड्डू वाघे विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !