धुळ्यातील लळींग घाटात विचित्र अपघातात सहा जण ठार

अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावलेल्या टोल कर्मचार्‍यांचाही मृत्यू : संतप्त कर्मचार्‍यांनी टोल बंद करीत छेडले आंदोलन


Six killed in a bizarre accident at Laling Ghat in Dhule धुळे (25 मे 2026)  धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून तिहेरी अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात सोमवार, 25 रोजी पहाटे हा अपघात घडला. वाळू वाहतूक करणारा डंपर एका वाहनाला धडकल्यानंतर त्याचवेळी पाठीमागून आलेली ट्रॅव्हल्स धडकली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 ते 12 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. विशेष म्हणजे अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावणार्‍या टोल कर्मचार्‍यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

असा घडला अपघात ?
धुळ्याजवळील लळिंग घाटातून भरधाव वेगाने जाणार्‍या रेतीच्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे डंपर विरुद्ध बाजूला गेला आणि समोरून जाणार्‍या एका वाहनावर धडकला. याचवेळी मालेगावकडून आलेले ट्रॅव्हल्स वाहन अपघातग्रस्त वाहनांवर जोरदार आदळल्यानंतर वाहनाचा चुराडा झाला.



मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
गंभीर जखमींना उपचारासाठी धुळ्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांची आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !