यावल बसस्थानकात दुचाकीला कट लागायच्या संशयावरून चालकाला मारहाण


यावल (25 मे 2026) : यावल शहरातील बस स्थानकात एस.टी.बस घेऊन आगारात आलेल्या चालकास आगारात येत तिघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली व धमकी दिली. ही घटना रविवारी दुपारी घडली. यरा प्रकरणी यावल पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
यावल एस.टी.आगारामध्ये एसटी बस चालक रफिक मुस्तफा शेख, (रा.शिवाजीनगर, जळगाव) हे रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बस घेऊन आले होते. दरम्यान त्यांच्या बसचा मोटरसायकलला कट लागल्याच्या संशयावरून बस स्थानकामध्ये महेंद्र मनोहर सोनवणे, जितेंद्र मनोहर सोनवणे, वैशाली जितेंद्र सोनवणे (रा.पंचशील नगर यावल) हे आले व त्यांच्यासोबत दोन अनोळखी लोक देखील आले तेव्हा या पाच जणांनी त्यांना तिथे येऊन शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांना भांडण सोडवण्यासाठी आलेले सुनील रमेश कोळी यांनादेखील त्यांनी मारहाण करण्यात आली. यात दोघांना दुखापत झाली तसेच त्यांना शिवीगाळ करून धमकी देखील देण्यात आली.



या प्रकरणी यावल पोलिसात वरील पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील पाटील करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !