भुसावळात पकडलेल्या बांगलादेशी महिलेस अटी-शर्तीवर जामीन

बनावट आधारकार्ड प्रकरणाचा तपास सुरू ; मदत करणार्‍यांची पोलिसांकडून चौकशी


Bangladeshi Woman Arrested in Bhusawal Granted Bail on Conditions भुसावळ (25 मे 2026) :  भुसावळात बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेस न्यायालयाने अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून संबंधित महिलेला भारतात वास्तव्यास राहण्यासाठी मदत करणार्‍या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.

शहरात आढळली बांग्लादेशी महिला
फरीदा बेगम मोहम्मद खान उर्फ जस्मिन बी मोहम्मद खान हिच्याकडे बनावट आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच इतर कागदपत्रे आढळून आल्याचा संशय आहे. या कागदपत्रांच्या आधारे ती भुसावळ परिसरात वास्तव्यास असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.



या प्रकरणात महिलेस आधार कार्ड तयार करून देणारे, बनावट कागदपत्रे उपलब्ध करून देणारे एजंट, दलाल तसेच स्थानिक स्तरावर मदत करणार्‍या व्यक्तींबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. तिच्या संपर्कातील व्यक्ती, मोबाईलमधील माहिती आणि कागदपत्रांची पडताळणीही सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांचे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून, तपास अधिक वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !