कोथळी-मुक्ताईनगर रस्त्यावर दुचाकी अपघात ; कोथळीतील तरुण ठार


Two-wheeler accident on Kothali-Muktainagar road ; youth from Kothali killed. मुक्ताईनगर (25 मे 2026) : दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात पवन नामदेव चौधरी (32, रा.कोथळी) या तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. कोथळी ते मुक्ताईनगर रस्त्यावरील हॉटेल योगासमोर हा अपघात 24 रोजी 8.45 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असा घडला अपघात
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पवन चौधरी हा आपल्या दुचाकी क्रमांक (एम.एच.19 ए.एच.0483) ने जात असताना रविवार, 24 मे रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास कोथळी ते मुक्ताईनगर रस्त्यावरील हॉटेल योगा समोर समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीने (एम.एच.19 डी.जी.9923) ने त्याला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पवन चौधरी (32) याचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला.



अपघात प्रकरणी मयताचा चुलत भाऊ प्रदीप प्रकाश चाधरी यांनीदिलेल्या फिर्यादीवरुन संशयीत नामदेव प्रल्हाद भील (रा.कोथळी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात नामदेव भील आणि त्याचा मुलगा तेजस नामदेव भील हे दोघेही गंभीर जखमी असून वाहनांचे नुकसान झाले आहे. तपास पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक संदीप वानखेडे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !